कामावर नसताना `तो` पोलीस महिलेच्या घरी का गेला? Police at woman`s home when he was off duty

कामावर नसताना `तो` पोलीस महिलेच्या घरी का गेला?

कामावर नसताना `तो` पोलीस महिलेच्या घरी का गेला?
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडमधल्या यमुनानगर पोलीस चौकीतल्या एका पोलीस कर्मचा-याच्या कारानाम्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस अडचणीत आलेत.

यमुनानगरमधला पोलीस कर्मचारी महेंद्र वायकर यानं एका महिलेच्या घरी रात्री साडे बारा वाजता प्रवेश केला. या महिलेवर एका व्यक्तीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला महिलेच्या घरच्यांनी लोखंडी गजानं मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झालाय.

पण कामावर नसताना तो महिलेच्या घरी का गेला याच उत्तर देताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडतेय. हा पोलीस कर्मचारी दोषी असेल, तर त्यावर कारवाईचं आश्वासन पोलिसांनी दिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 24, 2013, 21:09


comments powered by Disqus