Last Updated: Tuesday, February 11, 2014, 11:44
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापूर पोलीस दलातला लैगिंक छळाचं एक प्रकरण पुढे आलंय. पोलीस मुख्यालयातल्या एका लिपिकाकडून कॉन्स्टेबल तरुणीचा लैंगिक छळ होत असल्याचं निनावी पत्र पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्याकडे आल्यानं खळबळ माजलीय.
आस्थापना शाखेतल्या राज नावाच्या लिपिकाकडून लैंगिक छळ होत असल्याचं निनावी पत्रात म्हटलंय. पण या अर्जात तथ्य आहे की नाही याबाबत चौकशी करणं गरजेचं आहे, असं कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी म्हटलंय.
या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश निवासी पोलीस उपाधीक्षक किसन गवळी यांना देण्यात आलेत. पोलीस मुख्यालयात महिला दक्षता समिती असताना आणि महिला अधिकारी असताना त्यांच्याकडं ही तक्रार का दाखल केली नाही हेही तपासावं लागले असंही त्यांनी म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 11, 2014, 11:37