रंकाळा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात Pollution in Rankala Lake

रंकाळा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात

रंकाळा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

ऐतिहासिक कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणार रंकाळा तलाव. मात्र आज हा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात सापडलाय. पाण्यात वाढलेलं शेवाळं कुजलंय. त्यामुळे सगळं पाणी अक्षरशः हिरवं झालंय. मनपाच्या दुर्लक्षामुळे रंकाळा खराब झालाच आहे. पण नागरिकांचं आरोग्यालाही धोका निर्माण झालाय.

रंकाळा तलाव म्हणजे कोल्हापूरचं वैभव. कोल्हापूरकर सकाळ संध्याकाळ इथे फेरफटका मारायला येतात. कोल्हापूरकरांसाठीच नाही तर पर्यटकांसाठीही रंकाळा म्हणजे एक पर्वणी. मात्र आज याच रंकाळ्याच्या सौंदर्याला गालबोट लागलंय. प्रदुषणाने वेढलेला रंकाळा अखेरची घटका मोजतो की काय अशी स्थिती निर्माण झालीय़. रंकाळ्यात हिरव्या पाण्याचा थर जमलाय. पाण्यावरचं शेवाळं कुजल्यामुळे पाण्यावर हिरवा थर जमा झालाय. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलीय. शहरातलं लाखो लीटर मैलायुक्त पाणी थेट रंकाळ्यात मिसळलं जातंय. त्यामुळे हा प्रकार झालाय.
तलावाकडे नजर टाकली तर हिरवं पाणी दिसंतय. यामुळे परिसरात डास आणि चिलटांचं साम्राज्य पसरलंय. रंकाळ्याच्या या स्थितीमुळे पर्यावरण प्रेमी संतापलेत.

रंकाळ्याच्या प्रदुषणामुळे त्यातली जैवविविधताही धोक्यात आलीय. एकेकाळी पिण्याच्या पाण्य़ापासून शेतीच्या पाण्यापर्यंत कोल्हापूरची गरज भागवणा-या रंकाळ्याकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 15, 2013, 00:02


comments powered by Disqus