Last Updated: Saturday, February 16, 2013, 22:12
www.24taas.com, पुणेसध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उद्धळपट्टीची उदाहरणं समोर येत आहेत. शरद पवारांनी या सगळ्या प्रकारावर उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर या नेत्यांना माफी मागीतली आहे.
मात्र नाराजी व्यक्त करून काय फायदा? शरद पवार अशा नेत्यांची हाकालपट्टी करण्याची हिम्मत दाखवणार का असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे फक्त नेत्यांना तंबी देऊन सोडणार की अशा नेत्यांवर काही कारवाई होणार का? शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.. मात्र तरीही त्याकडे कानाडोळा करीत अनेक नेत्यांनी मात्र अमाप पैसा खर्च करीत आपल्या मुलांच्या लग्नाच थाट चालूच ठेवला होता.
First Published: Saturday, February 16, 2013, 21:30