कोल्हापुरात नवरात्रौत्सवाची तयारी पूर्णPrepartion of Navratri utsav Completed in Mahalxmi Temple, Kolhapur

कोल्हापुरात नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण

 कोल्हापुरात नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण
www.24taas.com , झी मीडिया, कोल्हापूर

कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झालीय. गेल्या आठ दिवसांपासून मंदिराची साई सफाई आणि रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळं मंदिर परिसर उजळून निघालाय.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मंदिर आणि मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केलीय. त्यामुळं महालक्ष्मी मंदिर परिसर न्हाऊन निघालाय. महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील भक्त मोठ्या संख्येनं महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी येतात.

दरम्यान, नवरात्रोत्सवात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी यंदा महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकाचे यात चित्रीकरण केलं जाईल. या यंत्रणेची जबाबदारी सुरक्षा एजन्सीकडे दिली असून, ५० लाख रुपये किमतीची दोन मशीन नवरात्रोत्सवापूर्वी मंदिरात कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी यापूर्वीच दिलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 15:46


comments powered by Disqus