युवती काँग्रेसचे नेतृत्व प्रणिती शिंदेंकडे, Prniti Shinde will lead yuvati Congress

युवती काँग्रेसचे नेतृत्व प्रणिती शिंदेंकडे

युवती काँग्रेसचे नेतृत्व प्रणिती शिंदेंकडे
www.24taas.com, सोलापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ आता काँग्रेसलाही राज्यभर युवती मेळावा घेण्याचं सुचलंय. राज्यातला पहिला युवती मेळावा सोलापुरात आयोजित करण्यात आला. आणि या मेळाव्याचं नेतृत्व केलं आमदार प्रणिती शिंदे यांनी.

या महिला मेळाव्याला दोन ते अडीच हजार महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंपाठोपाठ काँग्रेसनंही महिलांना समाविष्ट करुन राजकारण करायला सुरुवात केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार हे राज्यात आणि सुप्रिया सुळे दिल्लीत राजकारण करतील, असं स्वतः शरद पवार वारंवार म्हणत होते. मात्र राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून सुळे यांनी राज्यात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय.

राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीनं सुळेंची ही तयारी तर नव्हे ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये.

First Published: Saturday, October 27, 2012, 22:43


comments powered by Disqus