पुण्यात मनोरुग्णाचं थैमान... Psycho in Pune

पुण्यात मनोरुग्णाचं थैमान...

पुण्यात मनोरुग्णाचं थैमान...
www.24taas.com, पुणे

पुण्यामध्ये एका मनोरुग्णाने लोकांची चांगलीच दमछाक केली. रेल्वे गोदामाच्या छतावर चढून बसलेल्या या मनोरुग्णाला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दल तसंच रेल्वे पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तब्बल साडेतीन तास चालेलेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर या मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात यश आलं.

हे महाशय गेल्या दोन दिवसांपासून या छतावर साम्राज्य गाजवाताहेतआणि...त्यांना हटकणाऱ्या दोघांना त्यांनी जखमीही केलंय. त्यांचा उपद्य्वाप वाढल्यानंतर अग्निशमन दल तसंच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. सुरुवातीला दादा भाऊ करून झालं... काय पाहिजे काय नको याची विचारणा झाली. ‘तू खाली पडशील, तुला लागेल, तुला कोणी काही करणार नाही, तू फक्त खाली ये’ शंभर विनवण्या झाल्या तरी पठ्ठया ऐकायला तयार नाही. अखेर, तू खाली ये नाहीतर तुला इकडून ढकलून देतो असा दमही देण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला चारही बाजूनी घेरलं, तर तो झाडावर चढला. सगळ्यांचा थरकाप उडवणारं हे दृश्य होतं.



सरतेशेवटी झटापटीची वेळ आलीच. याच झटापटीत तो छतावरून खाली पडला. त्याला अलगद झेलण्यासाठी जंपिंग मॅट खाली पकडण्यात आलेली होती. मात्र तो भलतीकडेच पडला. खरंतर ही त्याला पकडण्याची चांगली संधी होती. पण तो इतका चपळ आणि चलाख निघाला की पडताक्षणी त्यानं धूम ठोकली. शे-दोनशे मीटर पाठलाग केल्यानंतर तो अखेर हाती लागला. एरवी आग विझवण्यासाठी तत्पर असलेल्या अग्निशमन दलासाठी हावेगळा आणि तितकाच आव्हानात्मक अनुभव होता. हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. या संपूर्ण थरार नाट्यानंतर तो सुखरूप सापडला हे त्याचं नशीबच.

First Published: Monday, March 25, 2013, 22:40


comments powered by Disqus