Last Updated: Tuesday, January 29, 2013, 16:44
www.24taas.com, पुणेपुण्यात एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागनं पर्दाफाश केला आहे. कोरेगाव परिसरातल्या गोल्ड फिल्ड प्लाझा इमारतीमधल्या एका फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी १२ मुली आणि ५ एजंटांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये सोलापूर, दिल्ली, पश्चिम बंगाल या देशातील मुलींबरोबरच रशिया, बांग्लादेश आणि नेपाळमधल्या तरुणींचा समावेश आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये ही घटना घडली आहे. कोरेगाव पार्क ही पुण्यातील उच्चभ्रू वस्ती आहे. त्यामुळे तेथील हे सेक्स रॅकेट फारच हाय प्रोफाईल असल्याचे समजते. यात अनेक देशी-विदेशी मुलींचा समावेश होता. त्यामुळे या रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय हितसंबंध असण्याची दाट शक्यता आहे. यात १२ मुली ५ एजंट ह्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोल्ड फिल्ड प्लाझामधील फ्लॅटवर छापा घातला असता, त्यांनी मुलींना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये देश-विदेशातील मुली पश्चिम बंगाल, दिल्ली सोलापुरातील मुली तर दुसरीकडे रशिया, बांग्लादेश आणि
नेपाळमधीलही काही मुली आढळून आल्या आहेत.
First Published: Tuesday, January 29, 2013, 16:41