सर्वाधिक आत्महत्याचं शहर बनलंय पुणे Pune is now become suicide city

सर्वाधिक आत्महत्याचं शहर बनलंय पुणे

सर्वाधिक आत्महत्याचं शहर बनलंय पुणे
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

जगभरात दरवर्षी अंदाजे दहा लाख माणसं आत्महत्या करतात. अनेकदा अशा आत्महत्या तणाव, मानसिक विकार, आर्थिक संकट आणि वैयक्तिक नातेसंबंधातील गुंता यामुळे घडतात. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने बनवलेल्या अहवालात आत्महत्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसतंय. या अहवालात पुण्याचा तिसरा क्रमांक लागतो.

विविध क्षेत्रातील कर्मचारी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. त्यामध्ये प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, फायन्यास अशा सेवा देण्याऱ्या कर्मचारांचा समावेश असतो. पुरुष अधिक प्रमाणात आत्महत्या करताना दिसतात. आत्महत्या करण्यास मानसिक तनाव कारणीभूत असल्याचे २०१२ मधील एनसीआरबी अहवालने स्पष्ट केलंय. तसेच २०१२ मध्ये पुण्यात २७३ जणांनी आत्महत्या केली होती.

यंदाच्या वर्षी सर्वात जास्त आत्महत्याचे प्रमाण बंगळूरमध्ये ५२० असून, मुंबईत ३१९ आहे. तर नागपूर २६१, दिल्ली २०८ आणि हैदराबाद १४४ एवढ्या आत्महत्याची नोंद झाली आहे. `आयटी क्षेत्रात कर्मचारी तणावामुळे आत्महत्या करत असल्याचे दिसून आलंय. तसेच अनेक मुले-मुली कामाच्या वेळा, दबाव आणि आर्थिक संकाटामुळे हतबल झाले आहेत. आत्महत्याचे प्रकार सल्लागार केंद्रातून थांबविले जाऊ शकतील.` असे कौटुंबिक सल्लागार अंजली जोशी यांचे म्हणणे आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 19:37


comments powered by Disqus