पाच एकर जमीन अवघ्या एका रुपयात सरकारजमा!, Pune katraj 5 acre land in one rupees only

पाच एकर जमीन अवघ्या एका रुपयात सरकारजमा!

पाच एकर जमीन अवघ्या एका रुपयात सरकारजमा!
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यातल्या टेकड्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किसन राठोडची कात्रज टेकडीवरची पाच एकर जमीन बुधवारी अवघ्याय एका रुपयामध्ये सरकारजमा करण्यात आलीय.

किसन राठोड यानं कात्रज बोगद्याच्याय वरच्याड बाजुला टेकडीवर बेकायदा खोदकाम करत मोठ्याव प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं होतं. सुरुवातीला राठोडच्या या उद्योगांकडे सरकारी यंत्रणेनं जाणीवपूर्वक दूर्लक्ष केलं. पण जून महिन्या‍त झालेल्या पावसात राठोडनं केलेल्या उद्योणगांमुळे कात्रजच्या बोगद्याजवळ पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यामध्ये दोघा मायलेकींचा वाहून गेल्यानं मृत्यूक झाला होता. त्यायनंतर खडबडून जागं झालेल्या जिल्हाधिकारी प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलत राठोडला ५७ लाखांचा दंड ठोठावला होता.

मात्र, अनेकवेळा नोटीस बजावूनही राठोडनं दंड न भरल्यानं त्याबच्या जमिनीचा जाहीर लिलाव करण्याचचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ६१ लाख रुपये ही किमान किंमत ठरवण्यात आली. मात्र, बोली लावून जमीन विकत घ्यायला कोणीच पुढे आलं नाही. त्यामुळे अवघ्या एका रुपयामध्ये राठोडची ही पाच एकर जमीन सरकारजमा करण्यात आलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


First Published: Tuesday, September 10, 2013, 23:01


comments powered by Disqus