Last Updated: Tuesday, March 26, 2013, 13:37
www.24taas.com, पुणे पुण्याच्या कोथरुड परिसरातील त्रिमूर्ती हाइटस या सहा मजली इमारतीच्या पार्कींग मध्ये आज पहाटे आग लागली या आगीत २२ दुचाकी आणि ४ कार जळाल्या.
या आगीची झळ पहिल्या मजल्यापर्यंत पोहचल्यामुळे इमारतीतील घाबरलेले रहीवाशी टेरेसवर गेले त्यानंतर त्यांना अग्निशामक दलाच्या क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित खाली उतरविण्यात आलं.
एका चार दिवसाच्या बाळा सहीत ४० ते ६० जणांची अग्निशामक दलाने सुटका केली. अग्निशामक दलाचे आठ बंब आणि दोन ब्रांटो क्रेनच्या सहाय्याने ही आग अटोक्यात आणली गेली.
First Published: Tuesday, March 26, 2013, 13:18