pune bomb Spot hands of Yasin Bhatkal

पुणे बॉम्बस्फोटात यासिन भटकळचा हात?

पुणे बॉम्बस्फोटात यासिन भटकळचा हात?

www.24taas.com, पुणे

पुणे बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिदीनच्या यासीन भटकळचाच हात असल्याची माहिती समोर येतीय सीसीटीव्ही फुटेजनुसार हे स्फोट भटकळनेच घडवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर दुसरीकडे २६/११ च्या मुंबई ह्ल्ल्यातील आरोपी अबु जिंदालनं गुन्ह्यांची कबुली देण्याची इच्छा व्यक्त केलीय आहे.

दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहारांतील साखळी स्फोटांचा मास्टर माईंड आणि इंडियन मुजाहिदीनचा फरार म्होरक्या यासिन भटकळ यानंच पुण्यातील बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली असून पाचपैकी तीन ठिकाणी खुद्द यासिननेच सायकलींमध्ये स्फोटकं ठेवल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत असल्याचा दावा सूत्रांनी केलाय.

१ऑगस्टला स्फोटांपूर्वी जंगली महाराज रस्त्यावरील मॅकडोनाल्डच्या विरूद्ध दिशेला सायकल ठेवली होती. याच परिसरात यासिन भटकळ दुपारी फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुडेजवरुन दिसत असल्याचं सांगण्यात येतय. यासिन भटकळ पाकिस्तान नसून तो भारतात असल्याचं यापूर्वीच स्पष्ट झालयं.

भायखळ्यात तो तर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर राहत होता. पुण्यातल्या बॉम्बस्फोटात सक्रीय सहभागाची शक्यता खरी ठरल्यास त्यानं एकप्रकारे पोलिसांना आव्हान दिल्याचं स्पष्ट होतयं.

First Published: Saturday, August 11, 2012, 09:58


comments powered by Disqus