राज यांच्या पुण्यातील सभेला `दंडुकेशाही`चा अडथळा? pune police and raj Thackeray rally

राज यांच्या पुण्यातील सभेला `दंडुकेशाही`चा अडथळा

राज यांच्या पुण्यातील सभेला `दंडुकेशाही`चा अडथळा

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्यातील ९ फेब्रुवारीच्या सभेला परवानगी देण्यासाठी पोलीस अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप पुण्यातल्या मनसे नेत्यांनी केलाय.

पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. याबाबत मनसेकडून पोलिसांकडे परवानगीसाठी अर्जही करण्यात आलाय.

मात्र परवानगीबाबत राजकीय दबावामुळं पोलिसांकडून अडथळे निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप मनसेचे नेते दीपक पायगुडे यांनी केलाय.

तसेच पोलिसांनी परवानगी दिली नाही, तरी पुण्यात राज ठाकरेंची सभा होणारच असा आक्रमक पवित्राही दीपक पायगुडे यांनी घेतलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 4, 2014, 15:17


comments powered by Disqus