Last Updated: Sunday, January 27, 2013, 16:18
नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणेएक चोर... 500 हून अधिक चो-या ही ओळख आहे एका अट्टल गुन्हेगाराची.. बंटी उर्फ देवेंद्रसिंग असं त्याचं नाव असून पुण्यातल्या समर्थ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या बंटीच्य़ा नावावर दिल्लीत 300 गुन्हे, कर्नाटकात 100 गुन्हे आणि 500 ते 600 चोऱ्यांचे आरोप आहेत. हा बंटी घरफोड्या आणि वाहनचोरीत सराईत आहे. ही पार्श्वभूमी आहे या अट्टल चोराची... त्याचं नाव आहे बंटी उर्फ देवेंद्रसिंग... हाच बंटी आता पोलिसांच्या जाळ्यात सापडला.,.. पुण्यातल्या समर्थ पोलिसांनी त्याला साई एक्झिक्युटिव्ह लॉन्जमधून अटक केलीय.. बंटीवर अनेक राज्यांमध्ये घरफोड्या आणि वाहनचोरीचे आरोप आहेत.. शिवाय 500 ते 600 चो-या केल्याचा आरोप बंटीवर आहे.. या सराईत चोरानं रियालिटी शो ‘बिग बॉस’ मध्येही काम केलंय.. तसंच ‘ओय लकी, लकी ओय’ हा बंटीच्या चोरीच्या जीवनावर सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकलाय. गेल्या अनेक दिवसांपासून विविध राज्यातले पोलीस त्याच्या शोधात होते.. अखेर साई एक्झिक्य़ुटिव्ह लॉन्जच्या मालकाचे प्रसंगावधान आणि समर्थ पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळं हा अट्टल चोर बंटी गजाआड झालाय...
केरळ पोलीसही या बंटीच्या चौकशीसाठी पुण्यात दाखल झालेत. या बंटीची ‘कृष्णा डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटी एक्सपर्ट’ नावाची एजन्सीसुद्धा आहे. अटकेनंतर या बंटीच्या चेह-यावर पश्चातापाचे कुठलेही भाव नव्हते. याउलट प्रसारमाध्यमांपुढं हसत हसत बंटी पोझ देत होता. याआधीही त्याला अनेकदा अटक करण्यात आली होती. मात्र दरवेळी पोलिसांच्या तावडीतून पसार होण्यात तो यशस्वी ठरला. त्यामुळं आता तरी या बंटीवर कडक कारवाई होणार का याकडं सा-याचं लक्ष लागलंय.
First Published: Sunday, January 27, 2013, 16:18