धक्कादायक : बायको-मुलांना ठार करून घेतलं जाळून, pune suicide after murder of wife & children

धक्कादायक : बायको-मुलांना ठार करून घेतलं जाळून

धक्कादायक : बायको-मुलांना ठार करून घेतलं जाळून
www.24taas.com, पुणे
आपल्या तीन लहान मुलांना आणि बायकोला विष पाजून कुटुंबप्रमुखानं स्वतः जाळून घेतल्याची घटना पुण्यात घडली आहे. या क्रूर अशा दुर्दैवी घटनेमुळे अनेकांना धक्का बसलाय.

पुण्यातल्या कोथरुडच्या लोकमान्य नगरमध्ये पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. परशुराम कलकट्टी असं कुटुंबप्रमुखाचं नाव आहे. त्यानं पत्नी गायत्री कलकट्टी, सात वर्षाची पायल, पाच वर्षाची मनिषा आणि तीन वर्षांचा करण यांना
विष देऊन ठार केलं. इतक्यावरच परशुराम थांबला नाही यानंत त्यानं स्वतःलाही जाळून घेतलं.

मृत परशुराम यांनी कुटुंबाला का संपवलं? याचं कारण मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. हे कुटुंब मुळचं कर्नाटकातील असल्याचं सांगण्यात येतंय.

First Published: Thursday, September 6, 2012, 08:21


comments powered by Disqus