r. r. patil home minister police - 24taas.com

आबांचे कार्यकर्ते खातायेत पोलिसांचा मार

आबांचे कार्यकर्ते खातायेत पोलिसांचा मार
www.24taas.com

सीएसटी दंगलीवरुन टीकेचा भडीमार झेलत असतानाच आता सांगली पोलिसांनी गोविंदांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. माधवनगरमध्ये ही घटना घ़डली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण झालेले तरुण गृहमंत्री आर आर पाटील यांचे कार्यकर्ते आहेत.

विजयाच्या घोषणा देणाऱ्या गोविंदांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. यात सहा गोविंदा जखमी झाले आहेत. मारहाणीचा निषेध म्हणून सांगलीत जोरदार आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर जिल्हा पोलिसांनी या प्रकरणी डीवायएसपी कविता नेरकर यांच्यासह चार पोलिसांची खात्यांतर्गत चौकशी करण्य़ाचे आदेश दिले आहेत.

आरपीआय नेते रामदास आठवले यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करुन कडक कारवाई करण्य़ाची मागणी केली आहे.

First Published: Monday, August 13, 2012, 10:24


comments powered by Disqus