Last Updated: Thursday, November 8, 2012, 21:41
www.24taas.com, कोल्हापूरकोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी आणि उद्योजकांच्या सुरू असलेल्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला आणि बैठक उधळून लावली.
यावेळी कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी असणाऱ्या सचिवाला शर्टाला धरून हॉलबाहेर काढण्यात आलं.महाराष्ट्र सरकार जिल्ह्यातील उद्योजकांना कोणत्याही सोयीसुविधा पुरवत नाही असा आरोप करत कर्नाटकात उद्योग स्थलांतरीत करण्याची भूमिका घेतली होती.
पण कर्नाटकात उद्योग नेण्यास शिवसैनिकांनी विरोध करत हॉलमध्ये घुसून गोंधळ घातला आणि उद्योजकांविरोधात घोषणाबाजी केली.
First Published: Thursday, November 8, 2012, 21:41