पुण्यात हुक्का पार्टीवर छापा, 50 जणांना अटकRaids on Hukka party in Pune, arrests 50 people

पुण्यात हुक्का पार्टीवर छापा, 50 जणांना अटक

पुण्यात हुक्का पार्टीवर छापा, 50 जणांना अटक
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यात हुक्का आणि मद्य पार्टीवर पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकून 39 उच्चभ्रू तरुण-तरुणी आणि हॉटेलमालकासह 50 जणांना अटक करण्यात आली. विमाननगरमधील हॉटेल धुव्वा दी कबाब हटमध्ये ही कारवाई करण्यात आली.

नितेश बबन तुपे (27) या हॉटेलचालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत सुशांत उमेश तमांग (19), संजय संजित तमांग, (20), नीलेश यशवंत बबुली (23), राजेश गणेश लिंबू (21), बलिराम प्रीतम यादव (23), सुनील अजय ठाकूर (22), सरमन चतुर सय्याम (20), रूपेश दसई यादव (22), गणेश प्रेम चव्हाण (25), नरेश चंद्रा भराल (22), वसंत परम थापा (22) तसंच रखवालदार रवी रेड्डी (40) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हुक्का पार्टीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांना दूर ठेवत भोसरी पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीनं हा छापा टाकण्यात आला. हॉटेलच्या टेरेसवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या 39 तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं. विदेशी मद्य आणि हुक्का तसंच इतर साहित्य, रोकड असा एकूण 61 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून सर्वांना कोर्टासमोर हजर करण्यात आलंय. हॉटेलचालक तुपे याला 15 हजारांच्या तर अन्य सर्वांची 2 हजारांच्या जामिनावर सुटका झाली.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 28, 2014, 15:22


comments powered by Disqus