Last Updated: Friday, January 31, 2014, 16:09
www.24taas.com, झी मीडीया, पुणेराज ठाकरे यांनी नाशिक आणि मुंबईच्या मनसे पदाधिकाऱ्यांना खडसावल्यानंतर, आज पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनाही सल्ला वजा इशारा दिला आहे.
लोकहिताची कामे न झाल्यास आपली दुसरी टीम तयार असल्याचं, यावेळी राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
लोकहिताची कामं न झाल्यास दुसरी टीम तयार आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिलं आहे. नाशिक आणि मुंबईत कार्यकर्त्यांना खडसावल्यानंतर राज ठाकरेंनी पुण्य़ातही त्याची पुनरावृत्ती केली.
राज ठाकरे यांनी पक्षाची कामं लोकापर्यंत पोहोचत नसल्याचं पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं. तसेच तुमच्या अशा कामांच्या जोरावर लोकसभा कशी लढवणार?, असा सवालही यावेळी राज ठाकरेल यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. आता या पंधरा दिवसांत मनसे पदाधिकारी कसे कामाला लागतात, आणि काय कामं करतात हे पाहणं निश्चितच औत्सुक्याचं ठरेलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 31, 2014, 16:07