राज ठाकरे नाराज, कोणाची काढली खरडपट्टी , Raj Thackeray angry

राज ठाकरे नाराज, कोणाची काढली खरडपट्टी

राज ठाकरे नाराज, कोणाची काढली खरडपट्टी
www.24taas.com , झी मीडिया, पुणे

आपल्या बैठकीतल्या चर्चा बाहेर जातातच कशा असा सवाल विचारत राज ठाकरे यांनी मनसेच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. पुण्यात सुरु असलेल्या या बैठकीत दुस-या दिवशी कसं काम करावं याचं त्यांनी मार्गदर्शन केलं. मात्र शुक्रवारच्या बैठकीत पदाधिका-यांना ठाकरी भाषेत झापणा-या राज यांनी आज काहीसा मवाळ भाषेत सल्ला दिला.

पुण्यात मनसे पदाधिका-यांच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंनी सर्वांचीच खरडपट्टी काढली होती. पदाधिकाऱ्यांनी काम केलं नाही तसेच योग्य तो रिझल्ट दाखविला नाही तर दुसरी टीम तयार असेल, असा दमच आपल्या कार्यकर्त्यांना राज यांनी भरलाय. त्यामुळे आजच्या बैठकीत राज काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होतं. कालच्या बैठकीपासून प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आलं असताना ही बैठकीतला सर्व तपशील बाहेर आल्यानं राज ठाकरे यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली.

आजच्या बैठकीत ठाकरे शैलीत नसलं तरी काम करा असा सूचक सल्ला राज ठाकरे यांनी दिला. त्यामुळे आज प्रसारमाध्यमांसमोर सर्वच मनसे नेते सांभाळून घेत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपली सक्रीयता दाखवण्यासाठी टोल आंदोलनाचा मुद्दा हाती घेतलाय.आता हा बैठकींचा हा सपाटाही याच प्रकारची वातावरण निर्मिती आहे का असाच प्रश्न उपस्थित केलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 1, 2014, 18:14


comments powered by Disqus