व्यंगचित्रकार राज ठाकरे!, Raj Thackeray in pune sammyelan

व्यंगचित्रकार राज ठाकरे!

व्यंगचित्रकार राज ठाकरे!
www.23taas.com, पुणे

अखिल भारतीय मराठी व्यंग चित्रकार संमेलनाला पुण्यात सुरुवात झाली. मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन चालणार आहे. या कार्यक्रमाला आर. के. लक्ष्मण यांनीही उपस्थिती लावली होती.

`संमेलनाच्या उद्घाटनाला व्यंग चित्रकार म्हणून उपस्थित होती. त्यामुळे इतर दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलणार नाही` असे सांगत राज ठाकरे यांनी कोणतही भाष्य करणे टाळलं. मात्र, उपस्थितांच्या आग्रहास्त त्यांनी एक व्यंग चित्र रेखाटले. तशी राज ठाकरेंची फटकेबाजी आपणास नेहमीच ऐकावयास मिळते.

या वेळेस राज ठाकरेंनी फटकेबाजी केली मात्र, ती त्यांच्या कुंचल्यातून... कुंचल्याचे फटकारे मारीत त्यांनी एक सुंदर व्यंगचित्र साकारलं. तसे राज ठाकरे त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे व्यंगचित्र साकारताना फारसे दिसून येत नाही. मात्र त्यांनी व्यंगचित्र संमेलनाला उपस्थिती लावून व्यंगचित्र काढून उपस्थितांची दादही मिळवली.

First Published: Saturday, February 2, 2013, 12:44


comments powered by Disqus