राज ठाकरे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यापासून दूरच? Raj Thackeray keeps distance from Pimpri

राज ठाकरे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यापासून दूरच?

राज ठाकरे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यापासून दूरच?
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संधी मिळेल तेव्हा अजित पवार यांच्यावर तोंड सुख घेतात. पण तेच राज ठाकरे अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड मध्ये मात्र येत नाहीत.

राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेतला. नगरसेवकांना कानपिचक्याही दिल्या. पण त्यांनी पिंपरी-चिंचवड मधल्या नगरसेवकांना मात्र बोलावलं नाही. त्यांची बैठकही घेतली नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड कडे लक्ष द्यावं आणि या ठिकाणी बैठक घ्यावी, अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात मनसेनं अनपेक्षित यश मिळवत ४ नगरसेवक पालिकेत पाठवले. पुण्याच्या तुलनेत हे यश खूपच कमी असलं तरी अजितदादांच्या बालेकिल्ल्यात मनसेने मिळवलेल हे यश नक्कीच महत्वपूर्ण आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 2, 2013, 18:36


comments powered by Disqus