Last Updated: Saturday, December 8, 2012, 19:44
www.24taas. com, पुणेमनसे अध्यक्ष राज ठाकरे `चक्क खाली वाकले`? ऐकून जरा विचित्र वाटतं ना? होय हे खरं आहे... पण खाली वाकले ते म्हणजे कृषीमंत्री शरद पवार यांचा आर्शीवाद घेण्यासाठी. वडिलधारे असे असणारे शरद पवार आणि राज ठाकरे यांची भेट होताच राज ठाकरे यांनी सर्वांसमक्ष खाली वाकून शरद पवार यांना नमस्कार केला. तितक्याच आपलेपणाने शरद पवार यांनीही राज ठाकरेंना आर्शीवादही दिला.
निमित्त होतं वनमंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्र्वजीत आणि उद्योगपती अविनाश भोसले यांनी कन्या स्वप्नाली यांचा शाही विवाहसोहळा. आणि त्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनीही या लग्नाला उपस्थिती लावली होती.
First Published: Saturday, December 8, 2012, 19:31