राज ठाकरेंचा शिवसेनेला `दे धक्का`, माजी जिल्हाप्रमुख मनसेत, Raj Thackeray `push` Shiv Sena ,

राज ठाकरेंचा शिवसेनेला `दे धक्का`, माजी जिल्हाप्रमुख मनसेत

राज ठाकरेंचा शिवसेनेला `दे धक्का`, माजी जिल्हाप्रमुख मनसेत
www.24taas.com , झी मीडिया, पुणे

पश्चिम महाष्ट्रातील काही शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील आणि खानापूर तालुका प्रमुख संजय विभूते यांनी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थित मनसे प्रवेश केला. यावेळी माजी आमदार परशराम उपरकर उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वीच बजरंग पाटील, संजय विभूते यांनी मनसे प्रवेशाचे संकेत दिले होते. शिवसेनेत सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप करीत बजरंग पाटील यांनी केला होता. तर माजी आमदार परशराम उपरकर यांच्या मनसे प्रवेशानंतर खानापूर तालुक्यातील काही पदाधिकारी त्यांच्या संपर्कात होते. याबाबत बैठका झाल्याच्याही चर्चा होत्या.

सध्या राज ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी काहींना राज यांनी कानपिचक्या दिल्याचे वृत्त आहेत. तर काहींची खरडपट्टी काढली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 1, 2014, 19:33


comments powered by Disqus