Last Updated: Sunday, December 9, 2012, 22:41
www.24taas.com, पुणेआज एक आगळावेगळा मोर्चा पुणेकरांचं लक्ष वेधून घेणारा ठरला. गे, लेस्बियन, इंटरसेक्स, तृतीय पंथीय अशा समाजात वेगळ्या समजल्या जाणाऱ्या लोकांनी हा मोर्चा काढला.
पुणे सार्वजनिक सभेपासून या मोर्चाला सुरुवात झाली. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता या मार्गे या मोर्चाची समाप्ती पुणे सार्वजनिक सभेजवळ झाली. समाजातील इतर व्यक्तींप्रमाणेच या व्यक्तींना मानसन्मान मिळावा.. तसंच याबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.
अशा व्यक्ती दारू किंवा इतर नशेच्या आहारी जातात. त्याविषयी आणि एचआयव्ही बाबतहीया लोकांमध्ये मोर्चाद्वारे जागृती करण्यात आली.
First Published: Sunday, December 9, 2012, 22:41