Last Updated: Tuesday, November 6, 2012, 16:51
www.24taas.com, सांगलीसांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. बिहारमधील तरूण राजू पासवान असं या आरोपीचं नाव आहे.
सांगली जिल्ह्यातील बेडग गावात २१ जून २०१० रोजी आरोपी राजू पासवान यानं नऊ वर्षांच्या अश्विनी शिरसाटवर बलात्कार करून तिचा खून केला होता. शाळेनं घरी येत असताना आरोपी राजू यानं अश्विनीला जबरदस्तीनं शेतात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
ती बेशुद्ध पडल्यावर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं राजूनं तिला विहिरीत फेकून तिचा खून केला. सांगलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात याचा खटला सुरू होता. आज याप्रकरणी न्यायाधीश श्रीमती व्ही.व्ही. कंकणवाडी यांनी आरोपी राजूला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
First Published: Tuesday, November 6, 2012, 16:05