भाचीचा बलात्कारनंतर खून, मामाला फाशी , Rape and murder, sentenced to death and uncle

भाचीचा बलात्कारनंतर खून, मामाला फाशी

भाचीचा  बलात्कारनंतर खून, मामाला फाशी
www.24taas.com, इस्लामपूर

भाचीचा बलात्कार करून खून करणा-या मामाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलीय. सदाशिव कांबळे असं या आरोपीचं नाव असून सदाशिवला सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलीय. आरोपी सदाशिवला खून प्रकरणी फाशी आणि बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा निकाल दिलाय. आरोपी सदाशिव कांबळेनं २६ फेब्रुवारी २०११ ला आपल्या ८ वर्षीय मावस भाचीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. बलात्कारानंतर सदाशिवनं निर्दयपणे भाचीचा खून केला. पोलिसांच्या मदतीनं पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आणि पोलिसांनी मामा सदाशिव कांबळेला पुण्यात पकडलं होतं.

सदाशिव कांबळेकडे चौकशी केली असता तिच्यावर बलात्कार करून मृतदेह कासेगावपासून ८ किमी अंतरावर एका शेतात टाकल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जावून मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. क्रूरकर्मा आरोपीला फाशीची कठोर शिक्षा सुनावल्यानं या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत होतंय.

दरम्यान, या आधी अशीच एक घटना घडली. शरीरसंबंधाला नकार दिल्याने मामाने भाचीलाच पेटविल्याची घटना अकोल्यात काही दिवसांपूर्वी घडलेय. मामानेच भाचीला जीवंत पेटवून दिलं. भाचीने शरीरसंबंधाला नकार दिल्याने मामाने हे कृत केलंय. या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

First Published: Tuesday, March 26, 2013, 18:26


comments powered by Disqus