बारामतीत १४ वर्षीय मुलीनं बलात्कार झाल्यानं स्वत:ला पेटवलंRape on 14 years girl in baramati, after s

बारामतीत १४ वर्षीय मुलीनं बलात्कार झाल्यानं स्वत:ला पेटवलं

बारामतीत १४ वर्षीय मुलीनं बलात्कार झाल्यानं स्वत:ला पेटवलं
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

दिल्लीत सामूहिक बलात्काराला एक वर्ष पूर्ण होत असतानाच बारामतीमध्ये धक्कादायक घटना समोर आलीय. चौदा वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केलाय.

घटनेनंतर मुलीनं स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीवर पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यारत आलीय. तर बलात्कार करणारा सुरेंद्र काळजे अजून फरार आहे.

बारामती तालुक्यातल्या तांदुळवाडीमध्ये राहणारी ही मुलगी रात्री आठ वाजता डोकं दुखत असल्यानं औषध आणण्यासाठी घराबाहेर पडली. घराबाहेर सुरेंद्र काजळे थांबला होता. सुरेंद्रनं त्या मुलीला अडवून सुनिता साळुंके हिच्या घरात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कुणाला सांगितली, तर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकीही सुरेंद्रनं मुलीला दिली.

घाबरलेल्या मुलीनं ही घटना कुणालाही सांगितली नाही. दुसऱ्या दिवशी तिनं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. यामध्ये ती ८० टक्के भाजलीय. जिच्या घरात हा बलात्कार झाला, त्या सुनिता साळुंखेला अटक करण्यात आलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 16, 2013, 20:40


comments powered by Disqus