नातेवाईकांनीच केला ८ वर्षांचा मनोरुग्ण मुलीवर बलात्कार! Rape on 8 years old girl

नातेवाईकांनीच केला ८ वर्षांचा मनोरुग्ण मुलीवर बलात्कार!

नातेवाईकांनीच केला ८ वर्षांचा मनोरुग्ण मुलीवर बलात्कार!
www.24taas.com, अहमदनगर

८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना अहमदनगर मध्ये घडली आहे . विशेष म्हणजे ही घटना रात्री उशिरा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सिद्धार्थनगर भागात घडली असून हि मुलगी मनोरुग्ण आहे. पिडीत मुलीच्या सख्या मावशीचे पती आणि त्यांचे भाऊ या दोघानीच या पिडीत मुलीला फूस लाऊन घरातून बाहेर नेउन तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने पिडीत मुलीला अहमदनगर च्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात या मुलीवर कुठल्याही प्रकारचे उपचार करण्यात आले नाही. अखेर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि तृतीय पंथीयांनी पुढाकार घेतल्यानंतर या मुलीवर उपचार करण्यात आले. एवढेच नाही तर रात्रभर पोलीस स्टेशनच्या बाहेर बसल्यानंतर पाहटे ४ वाजता तोफखाना पोलिस ठाण्यात २ जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपीचा पोलिस शोध घेत आहे. मात्र दुसरा आरोपी खुलेआम फिरत असून त्यालाही तात्काळ अटक करा या मागणीसाठी पिडीत मुलीचे नातेवाईक, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि तृतीयपंथीयांनी पोलिस स्टेशन मध्येच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

दरम्यान जो पर्यंत आरोपीला अटक करत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. मात्र आता या पिडीत मुलीला न्याय कधी मिळेल याकडेच आता पिडीत मुलीच्या नातेवाईकांचे लक्ष आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 30, 2013, 20:34


comments powered by Disqus