Last Updated: Friday, April 18, 2014, 15:58
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई राज्यात स्त्रियाचं काय पण लहान मुलंही सुरक्षित नसल्याचा सत्य उघड करणारी ही आणखीन एक घटना... पुण्यातील वानवडी परिसरात अकरा वर्षीय मुलीवर तिच्या स्कूलबसच्या सहाय्यकानंच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय.
या प्रकरणात पोलिसांनी स्कूलबसच्या सहाय्यकाला आणि चालकाला अटक केलीय. यो दोघांनाही न्यायालयानं २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. खालीद मोहंमद पठाण (२९ वर्ष), कमरुद्दीन गयासुद्दीन शेख (५२ वर्ष) अशी या दोघांची नावं आहेत.
पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेच्या स्कूलबसवर पठाण हा सहायक आहे तर कमरुद्दीन हा चालक आहे. ऑक्टोबरमध्ये एका दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान आरोपींनी पीडित मुलीला घरी न सोडता पठाण याच्या घरी नेले. त्यावेळी त्याने मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणामध्ये त्याला कमरुद्दीन याने मदत केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एन. काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमरुद्दीन याने मुलीवर बलात्कार होत असताना पठाणच्या घराची बाहेरून कडी लावून घेतली.
नुकतंच, एरंडवणा परिसरात एका अवघ्या चार वर्षीय मुलीसोबत शाळेच्या स्कूलबस चालक आणि सहाय्यकानं अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता, वानवडी परिसरात आणखीन एका मुलीवर स्कूलबस सहाय्यकानं बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानं पालक मात्र चांगलेच धास्तावलेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 18, 2014, 15:58