Last Updated: Sunday, December 30, 2012, 17:05
कैलास पुरी, www.24taas.com, पुणेगुलाब प्रदर्शन अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. गुलाबाचं सौंदर्य आणि निसर्गाची मुक्त उधळण पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. निमित्त आहे ‘रोज सोसायटी’च्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गुलाब प्रदर्शनाचं...
पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात आयोजित या प्रदर्शनात विविध जातींची, रंगांची फुलं पुणेकरांनी पाहिली. ही आकर्षक गुलाबाची फुलं पाहिल्यानंतर उपस्थितांना सहाजिकच या फुलांची छबी कॅमे-यात टिपण्याचा मोह आवरला नाही.
‘रोज सोसायटी’च्या वतीनं दरवर्षी हे प्रदर्शन भरवण्यात येतं. ही फुलं पाहिल्यानंतर तुमचं मन नक्कीच प्रफुल्लित झाल्याशिवाय रहात नाही. त्याचमुळे अनेक गुलाबप्रेमींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. गुलाबांची विविध रूपं आणि रंग पाहून सहाजिकच पुणेकर पुष्पप्रेमींना एक अनोखी सफर केल्याची अनुभूती मिळाली.
First Published: Sunday, December 30, 2012, 17:05