Last Updated: Sunday, June 30, 2013, 19:16
www.24taas.com, झी मीडिया, सांगलीराज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी थेट मुंडेंवर निशाणा साधला आहे. आर. आर. पाटील यांनी मुंडेंच्या वक्तव्यावर टीका केली आहे. निवडणूकीसाठी मुंडेंनी ८ कोटी रुपये आणले कुठून? असा थेट सवाल त्यांनी मुंडेंना या सभेत केला आहे.
सांगलीमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत मुंडेंवर टीका करताना आर. आर. पाटील यांनी मुंडेंसोबत काँग्रेसलाही चिमटा काढला. सत्ताधाऱ्यांनी निवडणूकीवर ८ कोटी खर्च केले असते, तर मी समजू शकतो. सत्तेतून कुठून तरी खाल्ले असतीलही. पण, मुंडेंची सत्तेतील कामगिरी ही केवळ फक्त पाच वर्षांची असून ८ कोटी इतका पैसा आला कुठून? असा प्रश्न पाटलांनी मुंडेंना केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे अद्यापही सत्तेत आहेत त्यामुळे त्यांनी अशाप्रकारे उधळण केली असती तरी समजू शकलो असतो. पण, भारतीय जनता पार्टी हीचा आतापर्यंतचा सत्तेतला कार्यकाळ हा केवळ ५ वर्षांचा आहे. या काळातही त्यांनी इतका पैसा कुठुन आणला असा प्रश्न त्यांनी मुंडेंसमोर मांडलाय.
यावरूनच या ५ वर्षात त्यांनी किती भ्रष्टाचार केला असेल, हे यावरुनच समजते असेही ते म्हणाले आहेत. फक्त पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतर सत्तेत नसतानाही जर मुंडे इतका खर्च करु शकतात तर मग सत्तेत आल्यावर काय करतील?
असंही ते पुढे म्हणाले. ८ कोटी खर्च करुन खासदार झाल्याचे सांगून प्रामाणिकपणा दाखवलेल्या मुंडेंना त्यांचा प्रामाणिकपणा आता अंगाशी आला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, June 30, 2013, 19:16