Last Updated: Wednesday, December 26, 2012, 00:08
www.24taas.com, पिंपरी-चिंचवडपिंपरी चिंचवडमध्ये काल रात्री चिखली परिसरात झालेल्या गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात ४५ वर्षीय आर टी ओ एजंट बाळासाहेब मिसाळ यांचा मृत्यू झालाय. यामुळं पिंपरी चिंचवड मधील गुन्हेगारीनं कळस गाठल्याचं सिद्ध झालंय.
हत्या, बलात्कार,घरफोडी, दरोडे आणि आता थेट गोळीबार.....ही भयानक परिस्थिती आहे अजित पवार यांच्या स्वप्नातलं शहर असलेल्या पिंपरी चिंचवडची. चिखली परिसरात आर टी ओ जवळच आर टी ओ एजंट बाळासाहेब मिसाळ याच्यावर सोमवारी रात्री अज्ञात इसामानी गोळीबार केला. मंगळवारी सकाळी त्यांचा यांचा मृत्यू झाला. आपापसाताल्या वादामुळ ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गेले काही दिवस कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवत गुन्हेगार बिनधिक्कतपणे शिरजोर झाल्याचं पाहायला मिळतंय. वारंवार होणा-या या घटनांमुळ पोलिस आता प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासही टाळाटाळा करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक उपाय योजना करण्याची मागणी आता जोर धरतेय...
झपाटयानं विकास होत असल्यामुळं पिंपरी चिंचवड अजित पवार यांच स्वप्नातलं शहर आहे. शहरावर गेले १५ हून अधिक वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसची पर्यायानं अजित पवार यांची एक हाती सत्ता आहे..शहरात वाढलेल्या गुन्हेगारी शहराची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वत: लक्ष घालण्याची गरज आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल शहर असल्यामुळं गुहमंत्री आर आर पाटील यांनीही याकडं लक्ष देण्याची गरज आहे.
First Published: Tuesday, December 25, 2012, 19:16