पुण्यात रूबी हॉस्पिटलची तोडफोड, Ruby Hospital on the attack

पुण्यात रूबी हॉस्पिटलची तोडफोड, ४ जखमी

पुण्यात रूबी हॉस्पिटलची तोडफोड, ४ जखमी
www.24taas.com , झी मीडिया, पुणे

पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली. रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलवर हल्लाबोल केला. या तोडफोडीमध्ये ४ कर्मचारी जखमी झालेत.

१९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी ही तोडफोड केली आहे. रूबी हॉस्पिटलमध्ये काल रात्री किडनीच्या विकारावरील उपचारासाठी दाखल असलेल्या तरूणाचा मृत्यू झाला. सकाळी या तरूणाचा मृतदेह त्याचे कुटुंबीय घेऊनही गेले. पण लगेचच साडेआठच्या सुमारास काही नातेवाईक आणि ४० ते ५० जणांचा जमाव हॉस्पिटलवर चाल करून गेला. त्यांनी तोडफोड केली. हल्ल्यानंतर हॉस्पिटलनं सुरक्षा पुरवण्याची मागणी केलीय.

रिसेप्शन भागातील सामानाची नासधूस केली. फर्निचर तोडून टाकले. जे सुरक्षारक्षक या जमावाला अडवायला आले त्यांनाही मारहाण झाली आहे. रूबी क्लिनीकतर्फे पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 17:49


comments powered by Disqus