Last Updated: Thursday, January 17, 2013, 23:45
www.24taas.com, पुणेज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचं आज पुण्यात निधन झालंय. त्या 86 वर्षोंच्या होत्या.
सासरी आणि माहेरी साहित्य, कला यांचा वारसा नसतानाही लग्नानंतर सोळा वर्षांनी त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते. नोकरी सांभाळत मराठी आणि हिंदीतून त्यांनी विपुलस लेखन केलं. 50 हून अधिक वर्ष लिखाण करणा-या ज्योत्सा देवधरांनी 21 कथासंग्रह, 19 कादंब-या, 4 ललित लेख संग्रह, नाटके आणि आत्मकथन असं विपुल लेखन केलं. आकाशवाणीवरुन कथाकथनाच्या माध्यमातून त्या घरोघरी पोहोचल्या.
मसापचा ज्येष्ठ साहित्यिक असा गौरव, केंद्र सरकारचा पुरस्कार, भारता भाषणा भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
First Published: Thursday, January 17, 2013, 23:45