युवक काँग्रेसची संवाद यात्रा Samvad Yatra by Yuva Congress

युवक काँग्रेसची संवाद यात्रा

युवक काँग्रेसची संवाद यात्रा
www.24taas.com, अहमदनगर

राज्यातील दुष्काळी परीस्थिती समजून घेण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने बुलढाणा ते सांगली अशी ही संवाद यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचा प्रवास सध्या अहमदनगर जिल्ह्यातून सुरु आहे.

यात्रेदरम्यान राज्यातील पाणी प्रश्नावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामुळे मराठावाड्याला पाणी मिळत नाही हा प्रश्न राज्याच्या युवक राजकारण्याच्या दृष्टीने गंभीर आहे त्यामुळे येत्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने या प्रश्नी योग्य तोडगा काढवा अशी मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली आहे.

तर या संवाद यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असलेल्या राज्याच्या महसुल मंत्र्यांनीही युवक काँग्रेसने सुचविलेल्या उपाय योजनांवर राज्य सरकार जरुर पावले उचलेल असे आश्वासन दिले आहे.

First Published: Monday, February 18, 2013, 21:24


comments powered by Disqus