Last Updated: Saturday, June 15, 2013, 22:18
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुण्यातल्या राजभवन परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी झालीय. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेले राजभवन हा पुण्यातला अत्यंत सुरक्षित असा भाग मानला जातो.
राजभवनच्या समोरच चतु:श्रूंगी पोलीस स्टेशन आहे. ऐन पोलीस स्टेशन समोरच झालेल्या या चोरीची दखल राज्यपालांनीही घेतली असून. या प्रकरणाचा तात्काळ तपास करावा अशी सूचना राज्यपालांनी केलीय.
एकुणच राजभवनच असुरक्षित असेल तर सामान्य पुणेकरांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 15, 2013, 22:18