`आबा, आम्ही तोंड उघडलं तर...` , sanjay patil vs r r patil in sangli

`आबा, आम्ही तोंड उघडलं तर...`

`आबा, आम्ही तोंड उघडलं तर...`

www.24taas.com, झी मीडिया, सांगली

सांगलीत पुन्हा एकदा आर. आर. पाटील आणि आमदार संजय पाटील संघर्ष रंगलाय. संजय पाटील यांनी पुन्हा एकदा आर. आर. पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केल्यानं अनेकांच्या नजरा या दोघांकडे वळल्यात.

तासगावच्या साखर कारखान्यावरून समोर आलेला हा संघर्ष आता टीकेला पोहचलाय. संजय पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही सांगलीमध्ये रंगलीय. आर. आर. पाटील आणि आपला संघर्ष हा आजचा नसून खूप जुना आहे हेही संजय पाटील यांनी म्हटलंय.

`आर. आर. आबा कपटी मित्र आहेत. पोलीस महिलांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कंत्राटदारांची वकिली करण्यात सध्या ते धन्यता मानत आहेत` असा घणाघाती आरोप करत कमरेच्या खाली वार करू नका, असं संजय पाटील यांनी आर आर पाटलांना उद्देशून म्हटलंय.

इतकंच नाही तर, `काचेच्या घरात आर आर पाटील राहतात त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये, आम्ही तोंड उघडली तर तुमच्या भावाची प्रकरण बाहेर येतील` असं सांगत त्यांनी गृहमंत्र्यांवर वैयक्तिक टीकादेखील केलीय.

तासगावचा साखर कारखाना संजय पाटलांनी ताब्यात घेतल्यानंतर आर. आर. पाटील आणि संजय पाटलांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष रंगलाय.





व्हिडिओ : नेमकं काय म्हणाले संजय पाटील, पाहा...



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 10, 2014, 20:32


comments powered by Disqus