Last Updated: Monday, February 17, 2014, 19:05
www.24taas.com, झी मीडिया, सातारासाताऱ्याचे पालकमंत्री शशीकांत शिंदे यांचे भाऊ ह्रषिकांत शिंदे यांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ऋषिकांत शिंदेंनी घरात प्रवेश करुन बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने नोंदवल्यावर सातारा पोलिसांनी ही कारवाई केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे हे माथाडी संघटनेत कार्यरत आहेत.
काही दिवसांपूर्वी ऋषिकांत शिंदे एका जागेच्या व्यवहाराची बोलणी करण्याच्या निमित्ताने पिडीत महिलेच्या घरी गेले. यानंतर त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे.
याप्रकरणी सातारा पोलिसांनी ऋषिकांत शिंदेंना अटक केली असून भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे मंत्री शशिकांत शिंदे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 17, 2014, 10:55