Last Updated: Thursday, May 2, 2013, 21:08
www.24taas.com, झी मीडिया, पुणे पुणे पोलिसांनी ५२ लाख रुपयांचं कोकेन जप्त केलंय. पुणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केलीय.
जप्त करण्यात आलेल्या कोकेनचं वजन ५२० ग्रॅम आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलीये. चारही आरोपी उत्तर प्रदेशचे आहेत. यातील दोन आरोपी मागच्या काही वर्षांपासून पुण्याजवळच्या तळेगाव इथे राहताहेत. उत्तर प्रदेशातील मथुरा इथून हे कोकेन आणण्यात आलं होतं.
पुण्यात त्याची विक्री केली जाणार होती. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून कोकेन जप्त केलं. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्याची मागच्या काही वर्षातील ही एकमेव घटना आहे.
First Published: Thursday, May 2, 2013, 21:08