होमगार्ड महिलाच चालवत होती सेक्स रॅकेट ! Sex Racket by home guard woman

होमगार्ड महिलाच चालवत होती सेक्स रॅकेट!

होमगार्ड महिलाच चालवत होती सेक्स रॅकेट!
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हयात हाय प्रोफाईल सेक्स रॉकेटचा सुळसुळाट सुरु आहे. कोल्हापूर पोलीसांनी असाच एक सेक्स रॅकेट जेरबंद केलय. हे रॅकेट कोल्हापूर होमगार्ड विभागात काम करणारी महिलाच चालवत असल्याचं पोलीसांच्या तपासात निष्पन्न झालय. रक्षकचं भक्षक बनलेल्या या धक्कादायक घटनेचा पाहूया एक स्पेशल रिपोर्ट

होमगार्डच्या असणाऱ्या पूजा उर्फ शेवंती बिरु वास्कर ही कोल्हापुरात चक्क सेक्स रॅकेट चालवत होती. होमगार्ड या नात्यानं पोलिसांना मदत करणे हिचं कर्तव्य आहे. पण या कर्तव्याचा तिला पार विसर पडला. पुजा कोल्हापूरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय. या प्रकरणी पोलिसांनी पुजा उर्फ शेवंतीसह सात जणांना अटक केलीय.

सेक्स रॅकेट चालविणारी होमगार्ड पुजा ही अधिकाऱ्यांपासून,शिक्षक, डॉक्टर यांच्यासह अनेकांना मुली पुरवत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात अशा प्रकारच्या सेक्स रॅकेटचा सुळसुळाट आहे. रक्षकच यामध्ये सहभागी होत असल्यानं नागरिकांत संतापाचं वातावरण आहे. हे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 29, 2013, 18:41


comments powered by Disqus