Last Updated: Monday, December 30, 2013, 21:42
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापूर शहरातल्या फुलेवाडी परिसरातल्या महिला पोलीस कर्मचा-याच्या घरात वेश्याव्यवसाय सुरु असल्याचं उघडकीस आलंय.
शहरातल्या शाहूपुरी परिसरातल्या लॉजमध्ये तसंच या भागातल्या एका बंगल्यात सुरु असलेल्या वेश्याव्यवसायच्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकानं या परिसरात छापा टाकून एजंट, लॉज व्यवस्थापकाला अटक केलीय.
फुलेवाडी परिसरातला हा बंगला एका महिला पोलीस कर्मचा-याचा आहे. त्यामुळे या महिला पोलीस कर्मचा-यचावरही तपासाअंती कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिलेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 30, 2013, 21:42