Last Updated: Friday, October 11, 2013, 16:31
www.24taas.com ,वृत्तसंस्था, पुणेसुशिक्षित पुणेकरांचे वास्तव्याचे ठिकाण असलेल्या कोथरूड परिसरात राजरोस सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उच्च आणि मध्यमवर्गीय राहत असलेल्या भुसारी कॉलनीमध्ये सुरू असलेले सेक्स रॅकेट पुणे पोलिसांनी काल उघडकीला आणले आहे.
पुणे पोलिसांच्या स्पेशल ब्रँचने काल रात्री ही कारवाई केली. यात एक एजंट आणि चार मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन मुली परदेशी तर दोन भारतीय असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या परदेशी मुली उझबेकिस्तानच्या आहेत.
रॅकेटची सूत्रधार कल्याणी देशपांडे ही मात्र फरार झाली आहे. यापूर्वीही सेक्स रॅकेट चालविण्याचे कल्याणी देशपांडेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी २००८ मध्येही कल्याणी देशपांडेला तीन मुलींना वाममार्गाला लावल्याबद्धल क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्यानंतर एप्रिल २०१३ मध्ये तिच्यावर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाजवळ ही कारवाई करण्यात आली होती.
कल्याणी देशपांडेवर खून, मारामारी, फसवणूक यासारखे गुन्हेही दाखल आहेत. मुंबईतही तिच्यावर वेश्या व्यवसायाप्रकरणी काही गुन्हे दाखल आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, October 11, 2013, 16:31