सेक्स रॅकेट चालवणारी कल्याणी देशपांडे तडीपार, sex racket operator kalyani deshpande exile

सेक्स रॅकेट चालवणारी कल्याणी देशपांडे तडीपार

सेक्स रॅकेट चालवणारी कल्याणी देशपांडे तडीपार

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
सेक्स रॅकेट चालवणारी, युवतींना फूस लावून वाममार्गास लावणारी जयश्री ऊर्फ कल्याणी देशपांडेसह इतर पाच गुंडांना पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. तिच्यावर विविध पोलिस ठाण्यांत आठ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वेश्या व्यवसायासाठी मुलींना डांबून ठेवणे, धाकदपटपशा करून वाममार्गाला लावणे, जीवघेणा हल्ला करणे, फसवणूक करणे आदी प्रकारचे गुन्हे तिच्यावर दाखल आहेत.

पोलिसांनी तिला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. इब्राहिम बाबू इराणी, रवींद्र वामन ढोले, संतोष ऊर्फ पांग्या मोहन कांबळे, तबरेज नासीर खान, निखिल अंकुश गिरी या पाच गुंडांनाही प्रत्येकी एक वर्षासाठी तडीपार केले आले. खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, जबरी चोरी असे विविध गुन्हे या गुंडांवर आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 18, 2014, 14:19


comments powered by Disqus