Last Updated: Tuesday, November 19, 2013, 11:48
www.24taas.com, झी मीडिया, पुणेभविष्य सांगण्याच्या बहाण्यानं तरुणीवर अत्याचार करणाऱ्या जोतिष्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. कोथरुड पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास उशीर केल्या कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोपही गोऱ्हे यांनी केला.
पीडित तरुणी ही कोथरुड इथल्या श्री. आगस्तनाडी शिव ज्योतिष निलामय या संस्थेच भविष्य पाहण्यासाठी गेली होती. तिथं भविष्य सांगणारा आरोपी कुप्पुस्वामी उर्फ मलन गोवर राममूर्ती यानं त्या तरुणीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नव्हे तर तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला.
पीडित महिला कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये आपली फिर्याद घेऊन गेली असता तिथल्या पोलिसांनी मुद्दाम तक्रार घेण्यास उशीर केला आणि चुकीची तक्रार नोंदवून घेतली, असा आरोप तरुणीनं केलाय. त्यामुळं आरोपीला पळून जाण्यास मदत मिळाली असा आरोप करण्यात येतोय.
दरम्यान, याबाबत शिवसेना पुढं सरसावली असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्यावतीनं हा प्रश्न मांडला जाईल असं शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 19, 2013, 11:48