शाहू महाराजांच्या स्मारकाला तत्वतः मान्यता Shahu Maharaj Memorial

शाहू महाराजांच्या स्मारकाला तत्वतः मान्यता

शाहू महाराजांच्या स्मारकाला तत्वतः मान्यता
www.24taas.com, कोल्हापूर

कोल्हापुरात शाहू मिलच्या जागी शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यास राज्य सरकारनं तत्वत: मान्यता दिली आहे. स्मारक उभारण्यासाठी समितीचीही स्थापना करण्यात आलीय.

काल विधानसभेत कोल्हापुरच्या आमदारांनी शाहू मिलच्या जागेवर शाहू स्मारक उभारण्याच्या मागणीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी याला पाठिंबा दिला होता. त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आलाय. शाहू मिलची 27 एकर जागा छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी मिळणार आहे.

स्वतः छत्रपती शाहू महाराजांनीच ही मिल सुरू केली होती. मात्र सध्या ही मिल राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाच्या ताब्यात होती. याठिकाणी टेक्सटाईल पार्क उभारण्याची योजना सरकारची होती. परंतु त्याबाबत सरकारनं काहीचं पाऊल उचललं नसल्यानं शाहू स्मारकाच्या मागणीनं जोर धरला होता.

First Published: Tuesday, December 18, 2012, 20:53


comments powered by Disqus