Last Updated: Wednesday, August 29, 2012, 16:13
www.24taas.com, पुणेराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांची पाठराखण केली आहे. आर.आर.पाटील एक उत्तम गृहमंत्री म्हणून काम करित आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी सीएसटी हिंसाचार प्रकरण व्यवस्थित हातळल्याचं प्रशस्तीपत्रही पवारांनी दिलं आहे.
मुंबई हिंसाचार प्रकरणात गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतांना पक्षाध्यक्ष शरद पवारांनी आर.आर.पाटलांची पाठराखण केली आहे.
मुंबई हिंसाचारानंतर आर आर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना, मनसे आणि भाजपकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी केलेली ही स्तुती महत्वाची मानली जातेय.
First Published: Wednesday, August 29, 2012, 16:13