Last Updated: Saturday, June 8, 2013, 14:49
www.24taas.com, झी मीडिया, राजगुरूनगरराजगुरूनगरला आलं की काहीतरी महत्त्वाचं घडतं असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक इशारा केला आहे... `मागच्या वेळेस जेव्हा राजगुरूनगरला आलो होतो त्यावेळेस मला काँग्रेस पक्षातून काढून टाकलं होतं... मात्र त्यानंतरच मी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. पण दिवस मात्र राजगुरूनगरचाच होता.` असं म्हणत पवारांनी सूचक इशाराच साऱ्यांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये जाहीर सभा होती या सभेतच त्यांनी नवी गुगली टाकली आहे.
पवारांनी काल केलेल्या धक्कातंत्राच्या पार्श्वभूमीवर ही सभा झाल्याने साऱ्यांचेच लक्ष त्यांच्याकडे लागून राहिलेले होते. त्यामुळे पवार आता कोणती खेळी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First Published: Saturday, June 8, 2013, 14:43