`ऊस कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलंय` sarad pawar on sugar cane factories

`ऊस कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलंय`

`ऊस कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलंय`
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

देशातील सध्याचं वातावरण हे द्वेशाचं आहे. मुंबईत कापड गिरण्याबंद पाडल्या, त्याप्रमाणे राज्यात ऊसाचे कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलं आहे, असं शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे.

शरद पवारांनी यावेळी महायुतीच्या नेत्यांच्या टीकेलाही उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसला कोणताही अल्टीमेटम दिलेला नाही, जर दिला असेल तर तो मीडियानेच दिला असेल, असं खोचक वक्तव्य करायला शरद पवार विसरलेले नाहीत.

नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या क्लिनचीटवर पवार बोलायला विसरले नाहीत, यावर बोलतांना पवार म्हणाले, साधं आहे आपल्या देशात न्यायालयाने दिलेल्या निर्णय आपण मानतो, मोदींना क्लिनचीट दिली असेल, तर आक्षेप घेण्याचं कारण असावं, असंही पवारांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीबाबत सु्प्रीम कोर्टाने क्लिनचीट दिल्याचं म्हटलं होतं, आणि सर्वोच्च न्यायालयाचा तो अंतिम निर्णय आहे, तो मानला पाहिजे, असं सांगून नरेंद्र मोदी यांचं समर्थन केलं होतं, यावर शरद पवारांनी हे उत्तर दिलं आहे. पवारांनाही आज उघडपणे नरेंद्र मोदी यांचं समर्थन केलं आहे.

राजकारणात कोणत्याही पक्षाशी चर्चा करणे गैर नाही, निवडणुका जवळ आल्यावर सर्व पक्षांशी चर्चा करणे, चाचपणी करण्यात गैर नसल्याचंही पवारांनी म्हटलं आहे. जर काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये तृणमूलशी चर्चा करत असेल, तर त्यात गैर वाटण्यासारखं काहीही नसल्याचा दाखलाही पवारांनी दिला.

राज्यातील लोकसभेच्या जागांवर पुढील आठ दहा दिवसात जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात येईल, अशी अपेक्षा असल्याचंही यावेळी पवारांनी सांगितलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 2, 2014, 14:37


comments powered by Disqus