दलित अत्याचार : प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार - पवार sharad pawar said, state goverment will c

दलित अत्याचार : प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार - पवार

दलित अत्याचार : प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार - पवार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दलितांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी गृहमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक तातडीने बोलवावी अशी सूचना दिली असल्याचं पवारांनी साताऱ्यात बोलतांना सांगितलं.

शरद पवार हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणणाऱ्या स्नूपगेट प्रकरणाची चौकशी करणे योग्य नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारचा कालावधी आता संपतोय, यामुळे आता धोरणात्मक निर्णय घेण्यात कोणती वेळ नाही, त्याला अर्थ नाही.

मोदींमागच्या चौकशीला अर्थ नाही असं म्हटल्यावर, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा होते, हे चुकीचं आहे असं पवारांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसची राज्यात आणि केंद्रात आघाडी आहे., म्हणून आम्ही आघाडीसोबतच राहू असं पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय.

इतकंच नव्हे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा वाढतील. पण स्वबळावर सत्तेत येणं अशक्य असल्याचं मत पवारांनी मांडलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 17:25


comments powered by Disqus